बळीराजाची पुन्हा क्रुर थट्टा, सरकारने दिली अवघ्या 1-2 रुपयांची मदत

बळीराजाची पुन्हा क्रुर थट्टा, सरकारने दिली अवघ्या 1-2 रुपयांची मदत

  • Share this:

osmanpura farmer25 एप्रिल : सरकारने पुन्हा एकदा बळीराजाची क्रूर थट्टा केलीये. अवकाळी पावसाने राज्यात फक्त 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं दाखवून झाल्यानंतरही सरकारने उस्मानाबादच्या एका शेतकर्‍याला पीक विम्याची नुकसान भरपाई म्हणून अवघा रुपया- दोन रुपये तोंडावर मारलेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या इटकूर गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. तिथल्या शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेंतर्गंत 2013-14साली प्रत्येकी 400 ते 500 रुपयांचा हप्ताही भरला होता आणि त्या बदल्यात हसमुद्दीन शेख या शेतकर्‍याने तब्बल 825 रुपये विमा हप्ता म्हणून भरले होते. आणि त्याला बँकेनं नुकसान भरपाई म्हणून मिळालेत अवघे 1 रुपया 30 पैसे...सरकारने ही थट्टा फक्त एका शेतकर्‍यापुरतीच मर्यादीच ठेवलेली नाहीये. याच इटकूर गावातल्या बलभीम शेळके यांना 3 रुपये 35,आत्माराम बिक्कड यांना 2 रुपये 82 पैसे, तर अर्जून लोणके- 2 रुपये 82 पैसे आणि कोडिंबा बसाळगे यांना 5 रुपये 63 पैसे मिळालेत. तर अरूण घाटे यांना फक्त सव्वातीन रुपये मिळालेत.मदतीच्या यादीवर एकूण 7 शेतकर्‍यांची नावे असून शासनाने त्यांना अवघी 25 रुपयांची मदत देऊ केली. यावरून आपलं सरकार बळीराजाच्या प्रति किती निष्ठूर बनलंय. याची प्रचिती येतेय.

पीक विम्याची कवडीमोल मदत

हसमुद्दीन शेख - 1 रुपया 30 पैसे

बलभीम शेळके - 3 रुपये 35 पैसे

आत्माराम बिक्कड - 2 रुपये 82 पैस

अर्जून लोणके- 2 रुपये 82 पैसे

कोडिंबा बसाळगे - 5 रुपये 63 पैसे

अरूण घाटे - 3रुपये 25

7 शेतकर्‍यांना 25 रूपयांची मदत

Follow @ibnlokmattv

First published: April 25, 2015, 2:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading