नवी मुंबईत मित्र पक्षच कमी पडला -शिंदे

नवी मुंबईत मित्र पक्षच कमी पडला -शिंदे

  • Share this:

eknath shinde23424 एप्रिल : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आणि अपेक्षेप्रमाणे आता पक्ष आणि युती अंतर्गत कुरबुरी,आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. नवी मुंबईत भाजप काहीसा कमी पडला त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबबात नाराजी व्यक्त केलीय. आमचा मित्र पक्षच नवी मुंबईत कमी पडला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

 शिवसेना-भाजप युतीला 44 जागा मिळाल्यायत. यात शिवसेनेला 38 तर भाजपला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागलंय. या निवडणुकीत शिवसेनेकडून जोरदार टक्कर देण्यात आली. विशेष म्हणजे भाजपने 44 उमेदवार मैदानात उतरवले होते. त्यापैकी फक्त 6 उमेदवारच निवडून आले. एकट्या सेनेनं एकाकी झुंज देत 38 जागा जिंकल्यात. त्यामुळे सेनेनं भाजपवर नाराजी व्यक्त केलीये.

Follow @ibnlokmattv

First published: April 24, 2015, 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading