अंबरनाथ पालिकेवरही भगवा !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2015 06:16 PM IST

अंबरनाथ पालिकेवरही भगवा !

ambarnath palika34423 एप्रिल : अंबरनाथ पालिकेच्या 57 जागांसाठी आज (गुरूवारी) मतमोजणी पार पडली. याठिकाणी शिवसेना पक्षाला 26 जागा मिळाल्याने तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

एकूण 57 जागांपैकी सेनेचे 3 उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडणून आले होते. बहुमतासाठी लागणारा 29 चा आकडा कुणालाच याठिकाणी पार करता आलेले नाही, पालिकेत सहा अपक्ष निवडणून आले असून यातील सेनेचे काही बंडखोर आहेत. यांना सोबत घेऊन सेना सत्ता स्थापन करणार असे संकेत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत. शहरात भाजपचं वर्चस्व असताना केवळ 10 जागांवर त्यांना विजय मिळवता आला आहे. तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवत मागच्यापेक्षा 5 जागाअधिक जिंकत 8 जागांवर विजय मिळवला आहे. मनसेची याठिकाणी पिछेहाट झाली असून 4 जागांचे त्यांना नुकसान झाले आहे. मनसेचे फक्त दोन उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी आणि रिपाइं यांनी आघाडी करूनही त्यांना काही वेगळे करता आलेले नाही. राष्ट्रवादी आणि रिपाइंचे 5 उमेदवार विजय झाले आहेत तर 6 अपक्ष याठिकाणी विजयी झाले आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2015 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...