प्रदेशाध्यक्ष पदावरून सुनील तटकरेंची उचलबांगडी होण्याची शक्यता

  • Share this:

ajit pawar and sunil tatkare22 एप्रिल : एप्रिलअखेर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरून सुनील तटकरे यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील आणि शशिकांत शिंदे यांची नावं चर्चेत आहे.

येत्या 27 एप्रिलला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 29 एप्रिलला पक्षाच्या विस्तारीत कार्यकारिणीत नव्या प्रदेशाध्यक्षांचं नाव जाहीर होणार आहे. सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या मतभेद असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार असल्याचं कळतंय.

तसंच सिंचन घोटाळ्यातल्या चौकशीचा परिणाम हेही कारण समोर येतंय. एवढंच नाहीतर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे छाप पाडण्यात कमी पडले. त्यामुळेच तटकरेंना हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणती नावं चर्चेत आहेत ?

- जयंत पाटील - सांगली

- राजेश टोपे - जालना

- दिलीप वळसे-पाटील - पुणे

- शशिकांत शिंदे - सातारा

Follow @ibnlokmattv

First published: April 22, 2015, 9:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading