औरंगाबादेत एमआयएम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

औरंगाबादेत एमआयएम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

  • Share this:

mim congress abad22 एप्रिल : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या मतदानाला गालबोट लागलंय. दुपारी रशीदपुरा भागात मतदान सुरू असताना काँग्रेस आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

या मारहाणीत तीन कार्यकर्ते जखमी झाले. जखमी कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी एमआयएमचे उमेदवार नासर सिद्दीकी यांना अटक करण्यात आलीये.

नासर सिद्दीकी हे गणेशनगर वॉर्डमधून उमेदवार आहे. या मारहाणीनंतर रशीदपुरा भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. रशीदपुर्‍यात शिघ्रकृती दलाची तुकडी तैनात करण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

First published: April 22, 2015, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading