उमेदवारासाठी पैसे वाटप करणार्‍या महिलेला रंगेहाथ पकडलं

उमेदवारासाठी पैसे वाटप करणार्‍या महिलेला रंगेहाथ पकडलं

  • Share this:

anvi mumbai sena21 एप्रिल : महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला आणि आता उमेदवार प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेण्यात व्यस्त आहेत. अशातच नवी मुंबईत अनेक गैरप्रकारही उघड होत आहेत. सोमवारी रात्री शिवसेनेचे उमेदवार संजू वाडे यांच्या समर्थक महिलेला मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. तर दुसरीकडे बोगस मतदारही उघड झालेत.

नवी मुंबईत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजू वाडे यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलंय. प्रभाग क्रमांक 12 मध्ये हा प्रकार घडलाय. संजू वाडे हे तिथले भाजप-सेना युतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या महिला कार्यकर्त्ता सुचिता पेंटर या पैश्

ााची पाकीटे मतदारांना देत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तर दुसरीकडे बोगस मतदारांची यादी उघड झालीय. प्रभाग क्रमांक 63 मध्ये मतदारांची नावं दोन वेळा नोंदवल्याचं समोर आलंय. एकाच इमारतीमध्ये बोगस मतदार असल्याचं आढळून आलंय. सातारा, रायगड, कराड या ठिकाणी असलेल्या मतदारांची नावं प्रभाग क्रमांक 63 वाशी मध्ये असल्याचं उघड झालंय. याबाबत निवडणूक आयोगकडे तक्रार करण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

First published: April 21, 2015, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading