नवी मुंबईत बोगस मतदारांची यादी उघड

  • Share this:

voter-slip20 एप्रिल : एकीकडे महापालिकांच्या निवडणुकींचा प्रचाराची आज सांगता झाली. तर दुसरीकडे बोगस मतदारांना पाय फुटले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत बोगस मतदारांची यादी उघड झालीये.

प्रभाग क्रमांक 63 मध्ये मतदारांची नावं दोन वेळा नोंदवल्याचं समोर आलंय. एकाच इमारतीमध्ये बोगस मतदार असल्याचंही आढळून आलंय त्यामुळे एकच खळबळ उडालीये.

याहुन धक्कादायक म्हणजे सातारा, रायगड, कराड या ठिकाणी असलेल्या मतदारांची नावं प्रभाग क्रमांक 63 वाशीमध्ये असल्याचं उघड झालंय. याबाबत निवडणूक आयोगकडे तक्रार करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: April 20, 2015, 11:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading