सलमान खान दोषी की निर्दोष ?, निकालाची तारीख उद्यावर

  • Share this:

salman_khan_hit_&_run20 एप्रिल : बॉलिवडूचा अभिनेता सलमान खान फूटपाथ अपघात प्रकरणाच्या निकालाची तारीख उद्या (मंगळवारी) जाहीर करण्यात येणार आहे. या प्रकरणात सरकारी वकील आज नाट्य रुपांतराचा व्हिडिओ सादर करणार होते. पण, तो करण्यात आला नाही. बचाव पक्षाच्या वकिलांनी आज त्यांचा शेवटचा युक्तीवाद सादर केला.

गेल्या सुनावणीच्यावेळी बचाव पक्षांकडून असा दावा करण्यात आला होता की, या प्रकरणातला मृत्यू सलमान खानच्या गाडीची धडक लागून झालेला नसून कार उचलणार्‍या क्रेनमुळे झालेला आहे. मात्र सरकारी पक्षाने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळेच आज हा नाट्यकिरण व्हिडिओ सरकारी पक्षातर्फे कोर्टात सादर केला जाणार आहे.

यापूर्वी सलमान नाही तर त्याचा ड्रायव्हर अपघाताच्या वेळेस गाडी चालवत होता, असा युक्तीवाद सलमानच्या वकिलांनी केला होता. तसंच अपघाताच्या वेळी सलमानची गाडी 30-40 किलोमीटर वेगात होती, असा युक्तीवादही बचावपक्षानं केला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2015 05:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading