बंडखोरांना मत म्हणजे एमआयएमला मत- उद्धव ठाकरे

बंडखोरांना मत म्हणजे एमआयएमला मत- उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav beed sabha

19 एप्रिल : बंडखोरांमुळे 'पानिपत' होईल असं वागू नका. बंडखोरांना मत म्हणजे एमआयएमला मत, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला. याच सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बंडखोरांना पक्षातून काढून टाकल्याचेही जाहीर केले.

औरंगाबाद महापालिकेच्या 113 वॉर्डाची निवडणूक 22 एप्रिलला होणार आहे. त्यासाठी प्रचार करायला आज अखेरचा रविवार राजकीय पक्षांना मिळाला. औरंगाबादमध्ये युतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते.

निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी युतीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी एमआयएम आणि बंडखोरांवरसडकून टीका केली. मातोश्रीच्या अंगणात येऊन निवडणूक लढवली आणि डिपॉझिट जप्त करून घेतलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एमआयएमला टोला लगावला. तसंच यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी प्रचारादरम्यान भूखंड हडपण्याचा आरोप एका पोस्टरवर पाहिल्याचे सांगून त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार भूखंड हडपण्यासाठी संरक्षणमंत्री झाल्याचा घणाघातही त्यांनी केला. तर, जिथे जाऊ तिथे खाऊ, हे नेहमीच पवारांचं धोरण राहिलेलं असल्याचं ही त्यांनी म्हटलं.

Follow @ibnlokmattv

First published: April 19, 2015, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading