नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते उपरे, नाईकांचं सेनेवर टीकास्त्र

  • Share this:

Ganesh naik 18 एप्रिल : शिवसेनेकडे नवी मुंबईत स्थानिक नेताच उरला नाही, सेनेचे सगळे नेते उपरे आहेत, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी शिवसेनेला लगावला. गणेश नाईक यांनी आयबीएन-लोकमतशी खास बातचीत केलीय. त्यात त्यांनी शिवसेनेवरही कडाडून हल्ला चढवलाय.

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीत सेनेची सत्ता आहे पण त्यांनी त्या भागाचा विकास का नाही केला ?, त्यांनी आधी ती सुधारावीत त्यानंतर इकडे लक्ष घालण्याची गरज नाही असा सल्लाही दिला.

तसंच नवी मुंबईत सिडकोची गरज नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केलंय. महापालिका असताना सिडकोची गरज काय असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय. टोल नाके म्हणजे भिकार्‍यांचे कटोरे आहेत. टोल नाक्यांची गरज काय, असं म्हणत त्यांनी टोलला विरोध केलाय. नवी मुंबईत पूर्ण बहुमतानं निवडून येऊ असा विश्वासही गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय.

गणेश नाईकांच्या मुलाखतीमधील ठळक मुद्दे

- टोल नाक्यांची गरज काय ? गाडी घेतानाच त्याचे अधिकचे पैसे घ्या

- घराणेशाही ही त्यांच्या कर्तृत्वावर आहे, मी घराणेशाही मानत नाही

- शिवसेनेला इथे ओरिजनल नेताच उरला नाही

- सेनेचे सध्याचे सगळे नेते उपरे आहेत

- माझ्यासोबत असलेले सगळे सोडून गेले त्यांच्याबद्दल मला कीव येते पण, वाईट अजिबात वाटत नाही

- महापालिका असताना सिडकोची काय गरज ?

- सिडकोपासून आम्हाला मुक्त करा

- अवैध बांधकाम असणार्‍यांची घरं कायम करणार

- प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांनाही FSI मिळायला हवा

- टोल नाके म्हणजे भिकार्‍यांचे कटोरे आहेत

- टोल नाक्यांची गरज काय ? गाडी घेतानाच त्याचे अधिकचे पैसे घ्या

- टोलच्या बाबतीत आघाडी सरकारनं धरसोड धोरण घेतलं त्यामुळे आघाडीची मतं घटली, त्याचा आम्हाला फटका बसला

- बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाची केली तुलना

- मध्यंतरीच्या काळात मी नाराज नव्हतो, कार्यकर्तेच चर्चा करत होते म्हणून मी मौन पाळलं होतं...

- नवी मुंबई ही CCTV चा जाळं उभारणारी राज्यातील पहिलीच महापालिका

- महिलांना 50 टक्के आरक्षण आहे... महापालिकेत त्याच पुढे येऊन काम करतील. त्यांचे पती नाही...

- महिला सबलीकरणासाठी अधिक लक्ष देणार

- सेनेनं मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीचा विकास का नाही केला ?

- त्यांनी आधी ती शहरं सुधारावीत इकडे लक्ष घालण्याची गरज नाही.

- नवी मुंबईत आम्ही पूर्ण बहुमतानं सत्तेत येऊ

Follow @ibnlokmattv

First published: April 18, 2015, 8:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading