मराठी सिनेमाची गळचेपी सुरूच!

मराठी सिनेमाची गळचेपी सुरूच!

  • Share this:

s1.reutersmedia

16  एप्रिल : मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला होता. पण मराठी सिनेमांची गळचेपी अजूनही सुरूच आहे. मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'काकण' या मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळूनही मल्टीप्लेक्समध्ये शो मिळत नाही आहेत. इतकेच नाही तर शोच्या बुकिंगमध्येही फसवणूक करून सिनेमाचं आर्थिक नुकसान करत असल्याची तक्रार काकण चित्रपटाच्या दिग्दर्शक क्रांती रेडकर यांनी केली आहे. यासंदर्भातच रेडकर आणि सिनेमाच्या कलाकारांनी आज (गुरुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांची भेट घेतली. यासंदर्भात मल्टिप्लेक्सचालकांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास मनसे स्टाईल खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खोपकर यांनी यावेळी दिला.

'काकण' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. मुंबईमध्ये या चित्रपटाचे काही शो हाऊसफुल्ल झाले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तरीही हा चित्रपट मल्टिप्लेक्समधून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचं या चित्रपटातील कलाकारांनी सांगितलं. यासंदर्भात 'काकण'ची टीम आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपटसेनेचे पदाधिकारी लवकरच सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार असून, त्यांना या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती करण्यात येणार आहे.

गेल्याच आठवड्यात तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीवेळी मल्टिप्लेक्सचालकांनी मराठी चित्रपटांसाठी 12 ते 9 या दरम्यानची हवी ती वेळ देण्यात येईल, असं सांगितलं होतं. पण, त्यानंतर आठवड्याच्या आतच 'काकण'ला शो मिळत नसल्यामुळे परिस्थिती बदलली नसल्याचे दिसते आहे.

Follow @ibnlokmattv

First published: April 16, 2015, 8:48 PM IST
Tags: prime time

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading