S M L

सौरभ गांगुली टीम इंडियाचा नवा कोच ?

Samruddha Bhambure | Updated On: Apr 16, 2015 06:09 PM IST

Gangully

16  एप्रिल : भारताच्या सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणूनही ओळख निर्माण करणारा सौरव गांगुली टीम इंडियाचा कोच म्हणून आपली नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत आहे. गांगुलीने आज (गुरूवारी) बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेतली. त्यामुळे गांगुली लवकरच डंकन फ्लेचर यांची जागा घेऊ शकतो, अशा चर्चांना जोर आला आहे.

गांगुली हा दालमिया यांच्या खास मर्जीतील मानला जातो. ते पाहता भारतीय क्रिकेटचे बॉस बनल्यानंतर दालमिया आणि गांगुली यांची आज झालेली भेट फार महत्त्वाची मानली जात आहे. 29 एप्रिलला बीसीसीआयची विशेष बैठक होत असून या बैठकीत गांगुलीला टीम इंडियाचा कोच बनवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं.

दरम्यान, बीसीसीआयने सौरवबरोबरच राहुल द्रविड हाही एक पर्याय ठेवला आहे. द्रविडच्या नावाचाही 26 एप्रिल रोजी होणार्‍या बैठकीत विचार केला जाणार आहे. 2015 वन डे वर्ल्ड कपनंतर डंकन फ्लेचर यांचा बीसीसीआयसोबतचा करार आता संपलेला असून त्यांना मुदतवाढ न देता नवा कोच नेमण्याचे आधीच निश्चित झालेले आहे. या पार्श्वभूमीवर गांगुली आणि द्रविड या दोघ्यांपैकी कोणीही कोच झाला तरी टीम इंडियाला बर्‍याच वर्षांनंतर भारतीय कोच मिळणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2015 06:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close