तासगावात सुमनताई पाटील यांचा विक्रमी विजय, विरोधकांचे डिपॉझिट जप्त

तासगावात सुमनताई पाटील यांचा विक्रमी विजय, विरोधकांचे डिपॉझिट जप्त

  • Share this:

suman patil

15  एप्रिल : तासगाव-कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांचा एकतर्फी विजय झाला आहे. सुमनताई पाटील यांनी भाजपाचे बंडखोर उमेदवार स्वप्निल पाटील यांचा 1,00,012 मतांनी पराभव केला आहे. बंडखोर स्वप्निल पाटील यांचं डिपॉझिटही जप्त झाले आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानं रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपसह इतर कोणत्याही मोठ्या पक्षाने सुमनताई पाटील यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. पण भाजपमधून बंडखोरी करत स्वप्निल पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. सुमनताई पाटील यांच्यासमोर एकूण 8 अपक्ष उमेदवारांचं आव्हान होते. 11 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात 58.74 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

मतमोजणीदरम्यान, तासगावचा गड राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झाले. सुमनताई पाटील यांनी तब्बल 1,31,927 मतं मिळवून पक्षाला विक्रमी विजय मिळवून दिला. स्वप्निल पाटील यांना अवघी 18, 273 मतंच मिळाली आहेत. शिवाय त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.

Follow @ibnlokmattv

First published: April 15, 2015, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading