महामानवाला राज्यभरातून अभिवादन

महामानवाला राज्यभरातून अभिवादन

  • Share this:

Ambedkar_Reuters_5Dec114  एप्रिल :  भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 124 वी जयंती आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला आहे.

राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी आज चैत्यभूमीला भेट दिली. राव यांनी बाबासाहेबांना वंदन केलं आणि तिथे उपस्थित असलेल्या भीमसैनिकांशी संवादही साधला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम आपल्या कार्यकर्त्यांसह इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन करणार आहेत.

दरम्यान, मुंबईत रिपाइंकडून चैत्यभूमी ते इंदूमिल अशी विजय रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेही उपस्थित राहतील. तसंच मुंबईतील चैत्यभूमीवर आज दुपारी हेलिकॉप्टरमधून बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2015 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading