अखेर लख्वीची जामीनावर सुटका!

  • Share this:

Zaki Rehman Lakhvi

10  एप्रिल : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी-उर-रेहमान लख्वीची सुटका करण्यात आली आहे. लाहोर हायकोर्टाच्या आदेशानंतर रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातून लख्वीला सोडण्यात आलं आहे. यावर भारताकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

पाकिस्तान सरकारला लख्वीविरोधात ठोस पुरावे सादर करता न आल्याने लख्वीला ताब्यात ठेवण्याचा सरकारचा निर्णय कोर्टाने रद्द केला. लख्वीवर असलेल्या आरोपाबद्दल सर्व कागदपत्रे दोन दिवसांत कोर्टात सादर करण्याचे आदेश पंजाब सरकारला दिले होते. पण, सादर झालेले पुरावे समाधानकारक नसल्याचे सांगत कोर्टाने लख्वीला मुक्त करण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तान कोर्टाच्या या निर्णयावर भारताने नाराजी निषेध व्यक्त केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2015 07:22 PM IST

ताज्या बातम्या