शिवसेनेकडून शोभा डे यांना मिसळ आणि वडापाव!

शिवसेनेकडून शोभा डे यांना मिसळ आणि वडापाव!

  • Share this:

BRKING940_201504091550_940x355

09 एप्रिल : मराठी चित्रपटांना 'प्राईम टाईम' दिल्याने ट्विटरवरून टीका करणार्‍या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत आज (गुरूवारी) शिवसैनिकांनी डे यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली.

मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्यात येणार असल्याने शोभा डे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच, मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडत आता मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्नऐवजी दहीमिसळ आणि वडापाव खावा लागणार असल्याचे म्हटलं होते. त्यावर शिवसेनेने डे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला. तसंच, सामनाच्या अग्रलेखातूनही खरपूस समाचार घेत डेंच्या तोंडात वडापाव कोंबण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर दहीमिसळ, वडापाव घेऊन दाखल झाले आणि जारेदार निदर्शने केली.

शिवसैनिकांच्या मोर्चामुळे पोलिसांनी शोभा डेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे. तसंच शोभा डे यांनी आपल्या ट्विटरवरून मुंबई पोलिसांचे आभार देखील मानले आहेत. मला कुठलिही भीती वाटत नाही. मुंबई पोलिसांचे धन्यावाद, असं शोभा डे ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेने पाठवलेला वडापाव आपल्याला आवडला, असं ट्विट डे यांनी केलंय.

 

Follow @ibnlokmattv

First published: April 9, 2015, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading