नागपूर सेंट्रल जेलमधून 58 मोबाईलसह 25 ग्रॅम गांजा जप्त

  • Share this:

nagpur central jail

नागपूर जेलमधून पाच कैदी फरार झाल्यानंतर एकामागोमाग एक धक्कादायक बाबी समोर यायला सुरुवात झाली आहे. जेलमधून 25 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

नागपूरच्या सेंट्रल जेलमधून आतापर्यंत 58 मोबाईल, 40 चार्जर, 12 सिमकार्ड, 4 पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. धंतोली पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय या कैद्यांकडे 4 पेनड्राईव्हही सापडले.

दरम्यान, नागपूर सेंट्रल जेल मधून पाच गुन्हेगारांना पळून जाण्यास मदत करणार्‍या आणखी दोन जणांना शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे. शेख वाजीज शेखे मोहम्मद ऊर्फ अबरार आणि चेतन हजारे या राजा गौस टोळीच्या गुंडांना पाच रिवॉल्वर आणि 47 कारतुसांसह अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरुद्ध अनेक गुन्ह्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता पर्यंत या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून 10 अधिकारी आणि कर्मचारी निंलबित झाले आहेत. पण फरार झालेल्या पाच आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे नागपुरचे मध्यवर्ती कारागृह हे खरोखरचं कारागृह आहे की कैद्यांच आरामगृह असा प्रश्न निर्माण झाला आहे.

First Published: Apr 8, 2015 09:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading