'त्या' ट्विटवरून शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव

'त्या' ट्विटवरून शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव

  • Share this:

Shobha de

08 एप्रिल : राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणार्‍या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना आणि मनसे आक्रमक झाले असून डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मराठी जनतेच्या भावना दुखावणारं वक्तव्य केल्याप्रकरणी डे यांनी सर्व जनतेची माफी मागावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये 'प्राइम टाइम'मध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती करणार, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल (मंगळवारी) विधानसभेत केली. मात्र, त्यावर शोभा डे यांनी आक्षेप घेत, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हुकूमशहा असल्याची टीका ट्विटरवरून केली होती.

तसंच आता मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्नऐवजी दही मिसळ आणि वडापाव खावा लागेल का, असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला होता. मराठी चित्रपटांवर माझं प्रेम आहे, तो कधी आणि कुठे पहायचा हे माझं मला ठरवू दे. हा निर्णय म्हणजे फक्त दादागिरी आहे, असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झाला असून जितेंद्र आव्हाड यांनीही डे यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान असल्याचे सांगत डे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

शोभाताई हे शोभत नाही ! आयबीएन लोकमतचे सवाल

  • मराठी सिनेमांना प्राईमटाईम मिळतोय म्हणून शोभाताईंना पोटदुखी झालीय का ?
  • शोभाताईंना दही-मिसळ आणि वडापाव यापेक्षा पॉपकार्न जवळचा वाटतोय का ?
  • शोभाताईंना मराठीचा द्वेष करून अमराठी लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची आहे का ?
  • शोभाताईंनी शेवटचा मराठी सिनेमा नेमका कधी बघितलाय हे तरी त्यांना आठवतंय का ?
  • मराठी सिनेमांना प्राईमटाईम हा विषय तरी नीट समजलाय का ?
  • मराठी सिनेमांना फक्त एक स्क्रिन मिळणार आहे हे तरी शोभाताईंना माहिती आहे का ?

Follow @ibnlokmattv

First published: April 8, 2015, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading