इतर प्राण्यांच्या कत्तलीवर बंदीचा विचार नाही - मुख्यमंत्री

इतर प्राण्यांच्या कत्तलीवर बंदीचा विचार नाही - मुख्यमंत्री

  • Share this:

fadnavis-l1

07 एप्रिल : गोवंश हत्याबंदीनंतर आता महाराष्ट्रातून मटण आणि चिकनवर बंदी घालणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले आहे. गोवंश हत्या बंदी व्यतिरिक्त इतर कुठल्याही कत्तलीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं आहे.

'गोवंश हत्याबंदी ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात इतर जनावरांची कत्तल करण्यावरही बंदी आणण्याचा विचार करु असं वक्तव्य राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुनिल मनोहर यांनी काल (सोमवारी) हाय कोर्टात केलं होतं. यानंतर राज्यात चिकन व मटणवरही बंदी आणणार की काय यावर चर्चा रंगली होती. यावरुन सरकारवर दबक्या आवाजात टीकाही सुरु झाली होती. यापार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं आहे.

मी स्वत: ऍडव्होकेट जनरलशी चर्चा केली असून गोवंश हत्या बंदी व्यतिरिक्त इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना केलेली नाही. तशा प्रकारची घटनेत तरतूदही केली नाही आहे. काही वृत्तपत्रांनी ऍडव्होकेट जनरल यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून बातमी छापली आहे. त्याच्या बोलण्यात बंदीबाबत कुठेही उल्लेख नाही. अशा प्रकारे बंदी आणण्याबाबत राज्य सरकारचं कुठलंही मत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारनं लागू केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यास आव्हान देणार्‌या याचिकांवर काल सुनावणी झाली. त्यावेळी ऍडव्होकेट जनरल यांनी ही भूमिका मांडली होती.

Follow @ibnlokmattv

First published: April 7, 2015, 7:36 PM IST

ताज्या बातम्या