Elec-widget

काँग्रेस उमेदवार विजय वडेट्टीवारना हद्दपारीची नोटीस

12 ऑक्टोबर चिमूरचे काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्यावर पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. निवडणुक प्रचाराच्या काळात वडेट्टीवार यांच्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडेट्टीवार यांना चिमूर विधानसभा मतदारसंघाबाहेर हद्दपार करण्याची नोटीस दिली आहे. वडेट्टीवार मतदारसंघात राहिले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांनी निवडणूकीच्या काळात माझ्यावर द्वेषापोटी कारवाई केल्याचं सांगत मंगळवारी सकाळी 8 पासून चिमूर पोलिस स्टेशनसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2009 08:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...