नागपूर सेंट्रल जेलमधून तीन दिवसात 47 मोबाईल जप्त!

  • Share this:

nagpur central jail

06 एप्रिल : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून आज (सोमवारी) दिवसभरात 12 मोबाईल सापडले आहेत. त्यामुळे तीन दिवसात सेंट्रल जेलमधून सुमारे 47 मोबाईल जप्त करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झाडाझडतीमध्ये कैद्यांनी लपवलेले 12 मोबाईल आणि काही पैसे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच तुरूंगात शस्त्रास्त्र लपवल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. मागच्या सोमवारी सेंट्रल जेलमधून पाच कैदी पसार झाल्यानंतर कारागृहातील अन्य कैद्यांची झडती घेण्यात आली. त्यात तब्बल 26 मोबाईल आढळले होते. त्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोलीसराज आहे की 'कैदीराज' असा सवाल विचारला जातोय.

Follow @ibnlokmattv

First Published: Apr 6, 2015 09:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading