S M L

शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

Samruddha Bhambure | Updated On: Mar 31, 2015 05:59 PM IST

शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

31 मार्च : ऊस उत्पादकांना मिळणार्‍या एफआरपीच्या मुद्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारची चांगलीच कोंडी केली. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं.

ऊस उत्पादकांना कारखानदारांकडून एफआरपीनुसार योग्य दर मिळत नाही. या मुद्यावरून विरोधकांनी आज विधानसभेत घेरलं. यावर उस उत्पादकांना साखर कारखानदारांनी एफआरपीनुसार दर द्वावा, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तसेच उसाचे उत्पादन जास्त होत असल्याने दर कमी मिळत असल्याचे स्पष्टीकरण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पण, त्यावर विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातले आमदार कापूस आणि धानाच्या प्रश्नावर आक्रमक झाले. कापूस आणि धानाला योग्य दर द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली.


दरम्यान, एफआरपी देताना तूट असेल तर ती भरून काढण्यासाठी सरकार मदत करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण, विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. या सर्वांमध्ये पाच वेळा कामकज तहकूब झालं आणि त्यानंतर अखेर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं.

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2015 05:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close