वर्ल्डकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

वर्ल्डकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

  • Share this:

AUS BANNER

26 मार्च : आज वर्ल्ड कपच्या दुसर्‍या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा धुव्वा उडवत फायनल गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा 95 रन्सनं दणदणीत पराभव केला.

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली कारण डेव्हिड वॉर्नर झटपट आऊट झाला. त्यानंतर ऍरन फिंच आणि स्टीव्ह स्मिथनं शानदार फटकेबाजी केली. स्मिथने धुवाँधार बॅटिंग करत सेंच्युरी ठोकली. त्याने 105 रन्स केले तर फिंचने 81 रन्स ठोकले. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन मोठा स्कोर करण्याच्या नादात आऊट झाले. मॅक्सवेल, वॉटसन, क्लार्क आणि फॉकनर झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले.

आज सुरुवातीला फटके पडल्यानंतर भारतीय बॉलर्सने कमबॅक केला. उमेश यादवने आज 4 विकेट घेत कमाल केलीये तर मोहित शर्माने 2 तर अश्विननं 1 विकेट घेतली. भारताने सावध सुरुवात केली. रोहित शर्माने 34 तर शिखर धवनने 45 रन्स केले पण विराट कोहली आज पूर्णपणे अपयशी ठरला. कोहली फक्त 1 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला तर सुरेश रैनाही 7 रनवर आऊट झाला. अजिंक्य रहाणे आणि कॅप्टन धोणीनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याला उशीर झाला होता. दबावाखाली टीम इंडियाच्या झटपट विकेट गेल्या.

अखेर जेम्स फॉकनरने 3, मिचेल जॉन्सनने 2 आणि स्टार्क आणि हेझलवूडनं प्रत्येकी 1 विकेट घेत टीम इंडियाची इनिंग गुंडाळली. टीम इंडियाचं वर्ल्डकपचं जिंकूण परत आणण्याचं स्वप्न भंगल झालं.

अधिक अपडेट्ससाठी लिंकवर क्लिक करा : http://ibnlive.in.com/cricketnext/live-score/full/australia-india/auin03262015174026.html

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2015 02:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading