आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला तूर्तास स्थगिती- मुख्यमंत्री

आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला तूर्तास स्थगिती- मुख्यमंत्री

  • Share this:

save RA

25 मार्च : आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास स्थगिती दिली आहे. विधान परिषदेमध्ये याबाबत त्यांनी माहिती दिली. मेट्रोच्या कारडेपोसाठी नवीन जागा शोधण्याचे काम सुरू असून, ती मिळाल्यावर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कारशेडच्या प्रकल्पात 2,298 झाडे बाधित होणार आहे. यातील 245 झाडे तोडणे हे अपरिहार्य असून, उरलेले 2044 झाडांचे पुर्नलागवड करण्याचा पर्याय प्रस्तावित असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

याच पार्श्वभूमीवर, गेले अनेक दिवस या प्रकल्पावरुन सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. मेट्रोच्या कारशेड प्रकल्पाला शिवसेना आणि मनसेकडून विरोध दर्शवला जात आहे. मेट्रोच्या कारडेपोसाठी आरे कॉलनीतील जागा बळकाविण्याचा डाव असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

आरे कॉलनीतील कारशेड प्रकल्पाला विरोध होत असल्याने त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या सुचनेनुसार, प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधणे किंवा झाडांच्या पुर्नलागवड करण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कारशेडसाठी पर्यायी जागांचा शोध तज्ज्ञांची समिती घेत आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2015 07:21 PM IST

ताज्या बातम्या