शिल्पा शेट्टीविरोधात कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचा गुन्हा दाखल

शिल्पा शेट्टीविरोधात कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचा गुन्हा दाखल

  • Share this:

IPL 2013 Match 18  RR v KXIP

23  मार्च : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रिपू सदन कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकात्याच्या एका कंपनीने शिल्पा आणि रिपू सदन कुंद्रा यांच्यावर 9 कोटी रूपयांना गंडवल्याचा आरोप केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रिपू सदन कुंद्रा हे इसेंशिअल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (इएसपीएल) या कंपनीचे मालक आहेत. या दोघांनी एम् के मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज जैन यांना दोन वर्षात 10 पट परतावा मिळेल असं आमीष दाखवत त्यांना नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला सांगितले. यानुसार एम के मीडियाने शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीत गुंतवणूकही केली. मात्र, काही महिन्यांनी हा सर्व प्रकार बोगस असून इक्विटी शेअर्सही बोगस असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. प्रत्यक्षात जैन यांना कुठलाही परतावा मिळालेला नाही. त्यामुळे कोलकाताच्या या कंपनीने शिल्पा शेट्टी आणि रिपू सदन कुंद्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि रिपू सदन कुंद्रा यांच्याविरोधात विश्वासघात, फसवणूक, जबरदस्तीने वसुली, धमकावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: March 23, 2015, 2:18 PM IST

ताज्या बातम्या