ICC चा दणका, भारत-बांगलादेश दौऱ्याआधी अष्टपैलू खेळाडूवर बंदीची कारवाई

ICC चा दणका, भारत-बांगलादेश दौऱ्याआधी अष्टपैलू खेळाडूवर बंदीची कारवाई

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी 20 मालिकेआधी आयसीसीने क्रिकेटपटूवर 2 वर्षांची बंदी घातली आहे. यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

दुबई, 29 ऑक्टोबर : बांगलादेशच्या क्रिकेट संघाला भारत दौऱ्याआधी मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. शाकिबवर ही बंदीची कारवाई मॅच फिक्सिंगची ऑफर मिळाल्याची गोष्ट लपवून ठेवल्याबद्दल करण्यात आली आहे. बांगलादेशच्या कसोटी आणि टी20 संघाचा कर्णधार असलेल्या शाकिब अल हसनने आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली नव्हती. त्याने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं स्वीकारलं आहे. त्यानंतर शाकिबवर आयसीसीने बंदीची कारवाई केली. आयसीसी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये शाकिब तिसऱ्या क्रमांकावर होता. आयसीसीने घातलेल्या दोन वर्षांच्या बंदीमध्ये एक वर्ष निलंबन ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता शाकिबला 29 ऑक्टोबर 2020 ला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळता येणार आहे.

भारत-बांगलादेश यांच्यात 2 नोव्हेंबरपासून टी-20 आणि कसोटी मालिका होत आहे. मात्र आता आलेल्या एका बातमीमुळं संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिक्सिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आयसीसीनं कडक नियम केले आहेत. बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनवर झालेल्या बंदीच्या कारवाईने त्याची क्रिकेट कारकिर्द धोक्यात आली आहे. खेळाडूंसोबत संप केल्यामुळं बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. मात्र त्याआधीच शाकिबवर आयसीसीकडून थेट बंदीची कारवाई झाली आहे. शाकिबला मॅच फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. ही माहिती शाकिबनं आयसीसीपासून लपवली, त्यामुळं त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.

वाचा-टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, बांगलादेशचे खेळाडू सोडणार भारत!

शाकिबनं लपवली फिक्सिंगची ऑफर

बांगलादेशच्या दैनिकात आलेल्या बातमीनुसार, शाकिबला दोन वर्षांआधी फिक्सिंगची ऑफर मिळाली होती. सामन्याआधी बुकीनं शाकिबला संपर्क केला होता. आयसीसीच्या नियमांनुसार फिक्सिंगची ऑफर मिळताच आयसीसी किंवा संबंधित अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असते. मात्र शाकिबनं याबाबत माहिती दिली नव्हती.

वाचा-BREAKING : कॅप्टन कोहलीच्या जीवाला धोका, दहशतवाद्यांकडून धमकी

आयसीसीच्या लाचलुचपत विभाग करणार शाकिबची चौकशी

रिपोर्टनुसार शाकिबला आलेल्या फिक्सिंगच्या ऑफरची कुणकुण आयसीसीच्या लाचलुचपत विभागाला लागली होती. याबाबत आयसीसीनं शाकिबची चौकशी केली. ही बाब शाकिबनं गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळं आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली. एवढेच नाही तर शाकिबला प्रशिक्षणही वेगळं देण्याचे आदेश चौकशीवेळी देण्यात आले होते.

वाचा-कुटुंबासाठी कायपण! भावाच्या वरातीसाठी स्टार क्रिकेटपटूनं सोडलं मैदान

2006 मध्ये शाकिबने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या 32 वर्षांचा असलेला शाकिब यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू ठरला होता. जगातील नंबर एकचा अष्टपैलू खेळाडू म्हणूनही त्याला ओळखलं जातं. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशसाठी शाकिब संघातून बाहेर पडणं धक्कादायक आहे. तसेच दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणं शाकिबसाठी आव्हानात्मक असणार आहे.

 

Published by: Suraj Yadav
First published: October 29, 2019, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading