सेल्फीच्या नादात सात तरुणांनी गमावला जीव

सेल्फीच्या नादात सात तरुणांनी गमावला जीव

  • Share this:

Nagpur map

23  मार्च : नागपुर जिल्ह्यातील वडदजवळच्या मंगरुळ तलावावर पिकनिकसाठी गेलेल्या सात तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. सेल्फी काढण्यासाठी तलावाच्या मध्यभागी स्वत:हून होडी घेऊन गेले आणि फोटो काढण्याच्या नादात होडी कलंडली. या दुर्घटनेत 10 पैकी 7जणांचा दुदैर्वी अंत झाला असून सुदैवाने तिघेजणं बचावले आहेत.

नागपूरच्या आशीर्वाद नगर भागात राहणार्‍या 10 कॉलेज तरुणांचा ग्रुप मंगरुळ तलावावर काल संध्याकाळी पिकनिकसाठी गेला होता. किनार्‍यावर लावलेली होडी हे तरुण स्वतःहून पाण्यात घेऊन गेले आणि त्यांचं हेच धाडस सात जणांच्या जीवावर बेतलं. तलावाच्या मध्यभागी गेल्यावर सेल्फी काढण्याच्या नादात, होडीत उभे राहिल्याने होडी एका बाजुला कलंडली. आणि यात सात जणांचा तलावात बुडून दुदैर्वी मृत्यू झाला. तर, तिघेजण या दुर्घटनेत बचावले आहेतय

तलावात बुडून मृत्यू झालेले सातही तरुण नागपूरच्या आशीर्वाद नगर भागात राहाणारे आहेत. हर्षल आदमने, चेतन आदमने, गोवर्धन थोटे, राहुल वाळोदे, राम शिवरकर, मकसूद शेख आणि अब्दुल सरफराज अशी या मृत मुलांची नावं आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: March 23, 2015, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading