ऊर्जा खात्यातल्या घोटाळ्याची चौकशी करा - राधकृष्ण विखे पाटील

ऊर्जा खात्यातल्या घोटाळ्याची चौकशी करा -  राधकृष्ण विखे पाटील

  • Share this:

Vikhe patil

20 मार्च : ऊर्जा खात्यात गेल्या दहा वर्षात झालेल्या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी विरोधीपक्षनेते राधकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली आहे. राज्याच्या राजकारणात एकीकडे सत्ताधारी पक्ष एकमेकांविरोधात भांडतायेत तर दुसरीकडे विरोधकही एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात ऊर्जामंत्री असलेल्या अजित पवारांवर निशाणा साधला.

विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे आरोप केले आहेत ते आघाडी सरकारच्या काळातले आहेत. त्यावेळी ऊर्जा मंत्रालय राष्ट्रवादीच्या ताब्यात होतं तर अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली दरीही समोर आली आहे.

ऊर्जा खात्यात गेल्या दहा वर्षात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत विखे पाटील यांनी कारभाराची श्वेतपत्रिका काढा आणि ऑडिट त्याचं करा अशी मागणीही केली आहे. 'आमच्या काळात या विभागात जो अंधार झाला आहे, तो तुमच्या काळात दूर करा. सत्य काय ते बाहेर येऊ द्या. गरज भासल्यास आमच्या मुळा प्रवराच्या कारभाराचीही चौकशी करा आणि हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा,' असंही विखे पाटील म्हणाले आहेत. व्ऊर्जा खात्याने निविदा न काढता 21 हजार कोटी रुपयांचे केलेले करार रद्द करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी ऊर्जामंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटलांचं वर्चस्व असलेल्या मुळा-प्रवरामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला भ्रष्टाचार उघड केला होता. त्यामुळे त्याचा राग मनात ठेवून विखे पाटलांनी हा आरोप केल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीने दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: March 20, 2015, 9:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading