'गिरगाव चौपाटी' आता होणार 'स्वराज्य भूमी'

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2015 12:57 PM IST

'गिरगाव चौपाटी' आता होणार 'स्वराज्य भूमी'

Girgum chawpaty

19 मार्च : मुंबईमध्ये फिरण्यासाठीचं हक्काचं ठिकाण म्हणजे गिरगाव चौपाटी. पण आता याच चौपाटीचे नामकरण 'स्वराज्य भूमी' असं करण्यात आलं आहे. पण त्यामुळे चौपाटीच्या नामकरणावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गिरगाव चौपाटीच्या परिसरात लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. गिरगाव चौपाटीवर त्यांच्या अनेक सभाही झाल्या होत्या.स्वराज्याच्या चळवळीत प्रचंड योगदान देणार्‍या लोकमान्य टिळकांवर ज्या परिसरात अंत्यसंस्कार झाले त्या जागेला स्वराज्य भूमी नाव द्यावे, अशी मागणी गेले कित्येक दिवस केली जात होती. मागील सरकारने याबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र, नव्या सरकारने हा प्रस्ताव मान्य केला आहे.

पण चौपाटीचं नाव बदलण्याच्या या निर्णयावर गिरगावकर नाराज आहेत. नाव बदलून असा कोणता फायदा होणार आहे, त्याशिवाय चौपाटीवरच्या सोयीसुविधा वाढवा, असं मत गिरगावकरांनी व्यक्त केलं आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2015 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...