महाबजेट : 1 ऑगस्टपासून एलबीटी रद्द

महाबजेट : 1 ऑगस्टपासून एलबीटी रद्द

  • Share this:

lbt stop breking news18 मार्च :  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस सरकाराचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीच्या आखाड्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करत मुनगंटीवार यांनी घोषणांचा पाऊस पाडला. गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेला एलबीटीचा प्रश्न बजेटमध्ये मार्गी लावण्यात आलाय. येत्या 1 ऑगस्ट 2015 पासून एलबीटी कर रद्द करण्यात आलाय. मात्र, दुसरीकडे टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा सपेशल टाळण्यात आलीये.

आघाडी सरकारच्या काळात लागू झालेल्या एलबीटी अर्थात स्थानिक कर प्रणालीला व्यापार्‍यांनी कडाडून विरोध केलाय. निवडणुकीच्या काळात भाजपने एलबीटी रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर या आश्वासनाची पूर्तता करत येत्या 1 ऑगस्ट पासून एलबीटी रद्द करण्यात येणार आहे. पण, दुसरीकडे व्हॅटमध्ये वाढ करण्यात आलीये. त्यामुळे व्यापार्‍यांची सुटका झालीये आणि ग्राहक लटकले आहे.

 

या बजेटमधील हे महत्वाचे मुद्दे...

- 1 ऑगस्ट 2015 पासून एलबीटी रद्द

- व्हॅटमधून वसूल करणार आर्थिक तूट

- सावकारी कर्जातून बळीराजाला मुक्ती मिळवून देणार

- 171 कोटी रूपये देऊन 2 लाख 23 हजार शेतकर्‍यांना सावकारी व्याजातून कर्जमुक्त करणार

- शेतकर्‍यांना वीज बिल, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट

- द्राक्ष शेतीला गारपिटीपासून संरक्षणासाठी विशेष प्रकारचं शेडनेट विकत घेण्यासाठी शेतकर्‍यांना सहाय्य करणार

- खासदार आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर आमदार आदर्श गाव योजना सुरू करणार

- जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या पाण्याचे नियोजन करणार

- जलविद्युत प्रकल्पांसाठी 900 कोटींची तरतूद

- सिंचनासाठी 7 हजार 272 कोटी

- राज्यातील रस्त्यांसाठी 3 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करणार

- नागपूर मेट्रोसाठी 197 कोटी 69 लाख रूपयांचा निधी

- पुणे मेट्रोसाठी 174 कोटी 99 लाख रूपयांचा निधी

- मुंबई मेट्रो-3ला गती देण्यासाठी 109 कोटी 60 लाख

- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 2 हजार 378 कोटी 73 लाखांचा आराखडा

- राज्यातल्या प्रमुख देवस्थान आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी 125 कोटींचा अतिरिक्त निधी

- राज्यातल्या बसस्थानकांचं नूतनीकरण करणार

- मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती इथं पहिल्या वर्षी नूतनीकरण

- बसस्थानक नूतनीकरण आणि बस खरेदीसाठी 140 कोटी निधी राखून ठेवलाय

- कर्करोगांवरच्या औषधांचा कर पूर्णपणे माफ

-वर्क बुक्स, वह्या स्वस्त होणार

-एलईडी लाईटवरचा कर कमी

-बेदाणे आणि मनुकांवरच्या करातली सूट कायम

- मद्य उत्पादनावरच्या करात वाढ

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2015 02:03 PM IST

ताज्या बातम्या