शिवसेनेने दिलेल्या 'गिरगाव बंद'च्या हाकेला गिरगावकरांचा चांगला प्रतिसाद

शिवसेनेने दिलेल्या 'गिरगाव बंद'च्या हाकेला गिरगावकरांचा चांगला प्रतिसाद

  • Share this:

Girgao band

18 मार्च : मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पाविरोधात आज (बुधवारी) शिवसेनेने 'गिरगाव बंद'ची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेस आणि मनसेनेही पाठिंबा दिला असून गिरगावकरांनी या 'बंद'ला चांगला प्रतिसाद दिला आहे.

गिरगावातील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत एमएमआरसीकडे कोणतेही ठोस धोरण नसल्याचे सोमवारी रहिवासी आणि एमएमआरसीच्या संचालिका अश्‍विनी भिडे यांच्यात झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. मेट्रो 3 प्रकल्प हा भूयारी असणार आहे. पण गिरगावमधलंमेट्रो रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी 777 कुटुंबांवर बेघर होण्याच्या वेळ आली आहे. या बेघर होणार्‍या कुटुंबांचं 500 मीटर परीसरातच योग्य पुनर्वसन करण्याची मागणी शिवसेनेने केली असून त्यासाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलनही सुरू केलं आहे. दरम्यान, शिवसेनेने पुकारलेल्या या 'बंद' उत्स्फूर्तपणे पाळण्यात येत आहे. आज सकाळपासूनच चिराबाजार, गिरगाव, ग्रॅण्ट रोड इथली गल्लीबोळांसह नाक्यानाक्यावर 'बंद'चे बॅनर झळकत आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडून आज सकाळी प्रिन्सेस स्ट्रीट सिग्नल ते गिरगाव प्रार्थना समाजपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यात व्यापारी वर्गासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. प्रकल्पबाधित नसणारे काही रहिवासीही मोर्चात सहभागी झाले आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: March 18, 2015, 11:57 AM IST

ताज्या बातम्या