गिरगाव बंदमध्ये सेनेसह काँग्रेसही सहभागी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2015 11:51 PM IST

uddhav_in_ekvira17 मार्च : मेट्रो-3 च्या विरोधात उद्या गिरगाव कृती समितीने गिरगाव बंद पुकारलाय. या बंदमध्ये शिवसेनाही सहभागी होणार आहे. या प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भेट घेतली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच या बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच एमएमआरसी (MMRC) अधिकार्‍यासोबत गिरगाव कृती समिती, शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. विशेष म्हणजे या बैठकीत गिरगाव कृती समिती सोबतच शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बैठकीत रहिवाश्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर एमएमआरसी अधिकार्‌यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी काहीवेळ गोंधळही घातला. अखेरीस गिरगाव बंद होणार असून सेनेसह मनसे आणि काँग्रेसही रस्त्यावर उतरणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2015 11:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...