मेट्रो-3 प्रकल्पाच्या विरोधात गिरगाव बंद अटळ

  • Share this:

metroमुंबई (16 मार्च): मेट्रो 3 प्रकल्पाच्या विरोधात गिरगाव कृती समितीचा 18 मार्चला बंद पुकारणार आहे. शिवसेना आणि मनसे या बंद मध्ये सहभागी होणार आहेत. स्थानिक रहिवासी आणि व्यापारी बंद मध्ये सहभागी होणार आहेत.

एमएमआरसी (MMRC) अधिकार्‍यांसोबत गिरगाव कृती समिती, शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. आज झालेल्या या बैठकीत गिरगाव कृती समिती सोबतच शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बैठकीत रहिवाश्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर एमएमआरसी अधिकार्‍यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी काहीवेळ गोंधळही घातला. एकूणच मेट्रो 3 प्रकल्पांवरून जे राजकारण होतेय त्याचे श्रेय घेण्यावरूनही शिवसेना आणि मनसे चढाओढ सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

First published: March 16, 2015, 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading