शाहरूख-काजोल पुन्हा एकदा एकत्र येणार

शाहरूख-काजोल पुन्हा एकदा एकत्र येणार

  • Share this:

srk and kajol4416 मार्च : 'डीडीएलजे'मधील राहुल आणि सिमरनची जोडी कुणी विसरू शकणार नाही अशीच होती. पण आता तब्बल 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा शाहरुख आणि काजोलची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'दिलवाले' या आगामी सिनेमात शाहरूख आणि काजोल पुन्हा एकदा एकत्र येतायत. 'माय नेम इज खान' नंतर 4 वर्षांनी हे दोघ एकत्र काम करताना दिसणार आहेत. तसंच वरूण धवनही या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा एक फुल टू एन्टरटेनर असेल, असं रोहित शेट्टीने सांगितलंय. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या शाहरूख आणि काजोलच्या सिनेमानं तब्बल 100 आठवडे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे शाहरूख आणि काजोलला पुन्हा एकत्र पाहायची प्रेक्षकांची इच्छा 'दिलवाले' च्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2015 06:11 PM IST

ताज्या बातम्या