कॉ.पानसरेंच्या हत्येला महिना पूर्ण; मारेकरी मोकाटच

  • Share this:

nafori attack on pansare

16 मार्च : कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला. मात्र, दुदैर्वीबाब म्हणजे अजूनही पानसरेंच्या मारेकर्‍यांचा शोध लागलेला नाही. यावरून पोलिसांचा तपास दिशाहीन झाल्याचे दिसून येते.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर 16 फेब्रवारीला त्यांच्या घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळया झाडल्या होत्या. त्यात गंभीर जखमी झालेल्या गोविंद पानसरे यांचा उपचारदरम्यान 20 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पानसेर दाम्पत्यावर हल्ला होऊन आज एक महिना पूर्ण झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांच्या 10 ते 12 टीम्स बनवून शोध मोहिम हाती घेतली,मारेकर्‍यांचे स्केच प्रसिद्ध झाले, काही बाईक्स ताब्यात घेण्याक आल्या पण, त्यांच्या मारेकर्‍यांपर्यंत पोहचण्यात पोलिस यंत्रणेला अद्यापही अपयश आलं आहे. हल्लेखोरांची माहिती देणार्‍याला 25 लाखाचे बक्षीस जाहीर करूनही हल्लेखोरांचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. यावरून पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने जात आहे, हे स्पष्ट होते. अंधश्रद्धा निमुर्लन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येलाही दिड वर्षाहून अधिक कालवधी लोटला तरी त्यांचे मारेकरीही पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाहीत. एकुणच पोलिसांच्या तपास यंत्रणेबाबत आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत समाजातून आता तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या हल्ल्यामागचे मास्टरमाईंड पकडण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का, असा सवाल पानसरेंच्या कन्या स्मिता पानसरे यांनी विचारला आहे. हल्ला झाल्यावर मुख्यमंत्री आश्वासनं देत होते, मग ते आता का मौन बालगून आहेत, असंही स्मिता पानसरे म्हणाल्या.

Follow @ibnlokmattv

First published: March 16, 2015, 12:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading