पाकिस्तानमध्ये आत्मघाती स्फोट; 14 जण ठार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2015 04:28 PM IST

पाकिस्तानमध्ये आत्मघाती स्फोट; 14 जण ठार

blastAFP15 मार्च : पाकिस्तानच्या लाहोर इथे दोन चर्चमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 14 जण ठार, तर 68 हून अधिक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या योहानाबाद परिसरात ही घटना घडली.

रविवार असल्यामुळे दोन्ही चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळे मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टीटीपी म्हणझे तहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या जमातुल अहरूर गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. योहानाबाद भागात असलेले रोमन कॅथोलिक आणि ख्रिस्ट चर्चला लक्ष्य करून दोन हल्लेखोरांनी हे आत्मघाती स्फोट घडवून आणले आहेत.

स्फोटात 14 नागरिक ठार झाले आहेत. जखमींची संख्या अधिक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जखमींना लाहोर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात असून जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे.

योहानाबादमध्ये पाकिस्तानातील सर्वाधिक ख्रिश्चन धर्मीय राहतात. दहशतवादी गेल्या अनेक दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांना लक्ष्य करत आहेत. 2013 मध्ये पेशावर येथील चर्चमध्ये झालेल्या अशाच दुहेरी स्फोटात सुमारे 80 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2015 02:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...