तीन तासांनंतर अखेर मोनोरेल सुरू

तीन तासांनंतर अखेर मोनोरेल सुरू

  • Share this:

monorail

15 मार्च : वडाळ्याहून चेंबूरच्या दिशेने निघालेली मोनो रेल वीजपुरवठा खंडित झाल्याने भक्तिपार्क इथे सकाळी आठ वाजता मध्येच बंद पडली. तब्बल तीन तासांच्या खोळंब्यानंतर मोनोरेलची सेवा सुरू झाली आहे. पण रविवार सेलिब्रेट करायला निघालेल्या प्रवाशांना मोनो रेलची आजची राइड जीवावर बेतणारी ठरली.

या मोनोरेलमध्ये 11 प्रवासी आणि दोन पायलट अशा एकूण 13 जणं अडकली होती. मोनो मध्येच बंद पडल्याने प्रवाशांना उतरण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. या सर्व प्रकारानंतर मोनो रेल प्रशासनाने अखेर प्रवाशांच्या बचावासाठी अग्निशमन दलाला बोलवून घेतलं. मोठ्या प्रयत्नानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात अश्निशमन दलाला यश आलं.

दरम्यान, मोनो रेल बंद पडल्याप्रकरणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी तीन दिवसात उत्तर देण्याची मागणी केली आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

फेब्रुवारी 2014 मध्ये मोठ्या थाटामाटात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मोनो रेलचं उदघाटन केलं. पण सुरुवातीपासूनच मोनो रेलची सेवा तांत्रिक बिघाड किंवा वीज पुरवठ्याच्या कारणांमुळे. यामुळे 'मुंबई मोनो'चं आकर्षण काही दिवसातच संपलं आणि प्रवासी संख्याही वाढण्या ऐवजी कमी होत गेली.

Follow @ibnlokmattv

First published: March 15, 2015, 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading