ब्रिटिश संसदेसमोर गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण

ब्रिटिश संसदेसमोर गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण

  • Share this:

gandhi sta14 मार्च : इंग्रजांविरोधात अहिंसेच्या मार्गाने लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. महात्मा गांधीजींच्या 9 फुटी पुतळ्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय.

या कार्यक्रमासाठी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून उपस्थित होते. तसंच बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली.

गांधीजींचा पुतळा इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या पुतळ्याच्या शेजारी उभारण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे गांधीजी आणि भारताच्या स्वातंत्र्याला विरोध करणारे चर्चिल असा विरोधाभास यामुळे अधोरेखित होतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2015 07:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading