आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी जाहीर

आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी जाहीर

  • Share this:

r r patil wif suman patil14 मार्च : दिवंगत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तासगाव विधानसभेसाठी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यासंबंधीची घोषणा केलीय. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच आबांच्या कुटुंबियापैकीच उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले होते. तसंच कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार देऊ नये अशी विनंती केली होती.

आज आबांच्या जागी त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांची घोषणा करण्यात आलीये. अजित पवारांनी विनंती केल्याप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसतर्फे तासगावमध्ये उमेदवार देण्यात येणार नाही, असं स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

First published: March 14, 2015, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading