गारपिटीचा तडाखा, नाशिकमध्ये 2000 हेक्टर द्राक्षांचं नुकसान

गारपिटीचा तडाखा, नाशिकमध्ये 2000 हेक्टर द्राक्षांचं नुकसान

  • Share this:

nashik4414 मार्च : नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांना गारपिटीचा फटका बसलाय. त्यामुळे इथल्या द्राक्ष, कांदा, गहू, डाळिंब या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आठ दिवसापूवीर्ंच गारपिटीनं इथल्या शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा गारपिटीने डोकंवर काढलंय. त्याचपाठोपाठ अहमदनगर आणि औरंगाबादलाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. गहु, कांदा, डाळिंब, द्राक्ष पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान. शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला.

द्राक्षांचं आतापर्यंत 2,000 हेक्टरवर नुकसान

फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीत द्राक्षांचं प्रचंड नुकसान झालंय. आतापर्यंत 2,000 हेक्टरवर द्राक्षांचं नुकसान झालंय. यामुळे द्राक्ष निर्यातीत 20 ते 25 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. अनेक शेतकर्‍यांनी 4 ते 5 लाख रुपये गुंतवून द्राक्षाचं पिक घेतलं होतं ते आता डोळ्यासमोर खराब होतंय. पिक एवढं सडतंय की निर्यातदार तर सोडाच, स्थानिक बाजारातही त्याला मागणी नाही.

औरंगाबाद जिल्ह्यालाही गारपिटीचा तडाखा

वैजापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. लाखगंगा, बाबतारा, डोणगाव, हिगोंंणी, कांगोणी, पुरणगाव, सावरखेडगंगा, कापुसवाडगाव, किरतपुर, नगिना-पिंपळगाव, गोयगाव, भोर-नारायणपूर गावांना वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस, काही प्रमाणात एक फुटांपर्यंत गारांचा थर साचलाय. वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडल्यानं अनेक घरांची पत्रे उडाली आहेत. अनेक जनावरं जखमी झाली आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: March 14, 2015, 1:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading