26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड लख्वी जेलमधून पुन्हा सुटणार !

26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड लख्वी जेलमधून पुन्हा सुटणार !

  • Share this:

lakhvi-1

13 मार्च :  मुंबईवरील सर्वात मोठ्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झाकी-उर-रहमान लख्वी याला जेलमध्ये डांबून ठेवणे बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण देत इस्लामाबाद हायकोर्टाने त्याच्या तातडीने सुटकेचे आदेश दिले आहेत. गेल्या सुनावणीवेळी कोर्टाने याप्रकरणी आपला आदेश राखून ठेवला होता.

लख्वी हा फेब्रुवारी 2009 पासून तुरूंगात असून त्याच्यावर मुंबई हल्ल्याप्रकरणी खटला सुरू आहे. मात्र त्याच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने पाकिस्तानी न्यायालयाने गेल्या वर्षी त्याची सुटका केली होती. भारत सरकारने यावर नाराजी नोंदवत या निर्णयाचा निषेध केला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकारने लख्वीला दुसर्‍या एका प्रकरणात पुन्हा ताब्यात घेतल्याने त्याचा तुरूंगातील मुक्काम कायम राहिला. मात्र आद पुन्हा इस्लामाबाद न्यायालायने त्याच्या सुटकेचा आदेश दिल्याने खळबळ माजली आहे.

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 जण मृत्युमखी पडले होते, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले होते.

Follow @ibnlokmattv

First published: March 13, 2015, 12:21 PM IST

ताज्या बातम्या