अवकाळी पावसाचे घेतला 2 चिमुरड्यांचा बळी

अवकाळी पावसाचे घेतला 2 चिमुरड्यांचा बळी

  • Share this:

avkali rain43412 मार्च : अवकाळी पावसामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मुलांना जीव गमवावा लागलाय. पुण्यात पवन चव्हाण या आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा पुण्यात ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अहमदनगरमध्ये भिंतीच्या ढिगार्‍याखाली अडकल्यामुळे 14 वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.

गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढले. ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. पुण्यातील आंबोडीमध्ये बुधवारी संध्याकाळी अवकाळी पावसाच्या वादळात शाळेतून बैलगाडीत घरी परतत असताना एका शेडचे पत्रे उडून डोक्याला लागल्याने पवन चव्हाण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. यात अकोले इथल्या वनवासी कल्याण आश्रमावर झाड़ पडून शाळेच्या भिंतीचा काही भाग कोसळला. भिंतीच्या ढिगार्‍याखाली समीर यशवंत धिंदळे या 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. समीर हा शिरपुंजे इथला असून आश्रम शाळेत राहात होता. दरम्यान, जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या पावसानं गहू, हरभरा, मका, डाळिंब पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2015 05:48 PM IST

ताज्या बातम्या