इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचं 14 एप्रिलला भूमिपूजन

इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचं 14 एप्रिलला भूमिपूजन

  • Share this:

indu milll3मुंबई (12 मार्च): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आता खर्‍या अर्थानं मार्गी लागलंय. आंबेडकरांचं प्रस्तावित इंदू मिलमधील स्मारकाचं येत्या 14 एप्रिलला म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवार यांनी आश्वासन दिल्याचं आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी सांगितलंय.

मुंबईतील दादर परिसरात इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य असं स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकारासाठी इंदू मिलची साडेबारा एकरची जागा वापरण्यात येणार आहे. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी आंबेडकरी संघटनांनी गेली कित्येक वर्ष लढा दिला. अखेरीस दोन वर्षांपूर्वी संघटनेच्या लढ्याला यश आले. आघाडी सररकारने इंदू मिलमध्येच बाबासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली. मात्र, घोषणा होऊन दोन वर्ष उलटली तरी स्मारकाच्या भूमिपूजनाचा निर्णय काही झाला नाही. आज रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी 14 एप्रिल रोजी स्मारकाचं भूमिपूजन होईल अशी माहिती दिलीये. त्यामुळे एका प्रकारे आंबेडकरी अनुयायांना महामानवाच्या जयंतीदिनी मोठी भेट मिळालीये.

Follow @ibnlokmattv

First published: March 12, 2015, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading