अजितदादा, फडणवीस सरकार बरसले, सावकारी घोषणा फसवी !

अजितदादा, फडणवीस सरकार बरसले, सावकारी घोषणा फसवी !

  • Share this:

dada on cm412 मार्च : राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आज विधानसभेत फडणवीस सरकारवर चांगलेच बरसले. फडणवीस सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केलीये. राज्य सरकारने सावकरी कर्ज माफीची घोषणा केली पण ही घोषणा निव्वळ फसवी असून असा कोणताही निर्णय घेतला नाही असं पवारांनी स्पष्ट केलं. तसंच केंद्रात भाजपच सरकार असून शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यात सरकार सपेशल अपयशी ठरलंय अशी टीकाही पवारांनी केली. नागपूरचे मुख्यमंत्री असून सुद्धा दिवसढवळ्या हत्या होतात ही शर्मेची बाब असून राज्यावर नेमका अंकुश कुणाचाय असा खडासवालही पवारांनी उपस्थित केला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पहिली दोन दिवस विरोधकांनी जोरदार आंदोलनं,घोषणाबाजी करून गाजवली. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. सावकारी कर्ज सरकारनं माफच केलं नसल्याचं माहिती अधिकारात उघड झाल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकरी हवालदील झाले आहे. अधिकार्‍यांना पंचनामे करण्याची परवानगी नाही. केंद्रात यांचंच सरकार असतानाही मदत मिळाली नाही. यूपीए सरकार असताना शेतकर्‍यांना मदत पुरवली जायची. पण आता तसं काहीही होत नाही. उलट मदत न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या घटना घडत आहे. केंद्रात भाजपचं सरकार असताना राज्याला एक पैसा मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी हल्लाबोल केलाय.

राज्यावर अंकुश कुणाचा ?

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी घेतली. पहिलं असं नव्हतं. छगन भुजबळ, आर.आर.पाटील यांनी गृहमंgत्रपदाची स्वतंत्र्यपणे जबाबदारी सांभाळली. पण, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे त्यांनीच गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारण्याचा निर्णय घेतलाय. आता जबाबदारी घेतली असली तर पाच महिन्यात पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादेत गुन्ह्यात वाढ झालीये. महिला, लहान मुलं सुरक्षित नाहीये. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच दिवसाढवळ्यातच हत्या होत आहे. पण तरीही पोलीस अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. राज्यभरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त झाला, मंत्र्यांना जीवेमारण्याच्या धमक्या मिळत आहे. नेमकं राज्यात काय चाललंय यावर कुणाचा अंकुश आहे. कायदा सुव्यवस्था बिघडलेली असताना मुख्यमंत्र्यांना झोप येतेच कशी, असा सवाल अजितदादांनी विचारला.

शिवसेनेला चिमटे

सोबतच शिवसेनेच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातली अवस्था बघवत नाही, कोण पहिल्या रांगेत बसतंय कोण ?, मागे बसतंय ?, काहीच कळत नाहीये असं म्हणत अजितदादांनी शिवसेनेला चिमटे काढले.

Follow @ibnlokmattv

First published: March 12, 2015, 4:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading