सेंसेक्स 21,800च्या वर, निफ्टीनेही पहिल्यांदाच गाठली 6500ची उंची

सेंसेक्स 21,800च्या वर, निफ्टीनेही पहिल्यांदाच गाठली 6500ची उंची

  • Share this:

Image img_10361_sharemarket_final_240x180.jpg07 मार्च : निवडणुकांपूर्वीच्या वातावरणाचे पडसाद शेअर बाजारातही पहायला मिळतायत. काल सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर आजही सेंसेक्सची घोडदौड सुरूच आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकाने शुक्रवारी सकाळी196 अंकांनी उसळी मारत 21685.80 हा नवा टप्पा गाठला.

शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स 21685.80 वर पोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीनेही नवी उंची गाठलीय. निफ्टी 6500च्या वर ट्रेड होत होता.

दरम्यान सेन्सेक्सने नवा टप्पा गाठलेला असताना भारतीय रुपयाही मजबूत होताना दिसत असून तीन महिन्यांमध्ये पहिल्यांदाच रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 61 पर्यंत झाली आहे. गुरूवारी शेअर बाजार बंद होताना एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ६१.११ इतकी होती. मात्र शुक्रवारी सकाळी रुपयाच्या किंमतीत १० पैशांनी सुधारणा होऊन तो ६१.०१ वर पोचला.

First published: March 7, 2014, 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading