'या' खेळाडूचा हेलिकॉप्टर शॉट पाहून तुम्ही धोनीलाही विसराल, पाहा VIDEO

'या' खेळाडूचा हेलिकॉप्टर शॉट पाहून तुम्ही धोनीलाही विसराल, पाहा VIDEO

क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मिस करताय तर पाहा हा VIDEO.

  • Share this:

सिडनी, 28 ऑक्टोबर : महेंद्रसिंग धोनीला मॅचविनर खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचे तर जगभरात चाहते आहेत. मात्र, गेले काही महिने धोनी क्रिकेटपासून दूर आहे. वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं एकीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे तो टी-20 वर्ल्ड कप खेळणार असल्याचा दावाही केला जात आहे. दरम्यान, धोनीच्या हेलकॉप्टर शॉटला विसराल असा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याच झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात कांगारूंनी आक्रमक फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियानं तब्बल 134 धावांनी या सामन्यात बाजी मारली. डेव्हिड वॉर्नरनं शतकी खेळी केली तर, मॅक्सवेल आणि फिंच यांची आतषबाजी पाहायला मिळाली. मात्र या सगळ्यात मॅक्सवेलचा हेलिकॉप्टर शॉट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मॅक्सवेलनं 18व्या ओव्हरमध्ये धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट लगावला. मॅक्सवेलनं या सामन्यात 28 चेंडूत 62 धावांची स्पोटक खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं 233 धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात वॉर्नरनं टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये पहिली शतकी खेळी केली. तर, वर्ल्ड कप 2019नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियानं टी-20 सामना खेळला. त्यामुळं या विजयाचा त्यांना टी-20 वर्ल्ड कप 2020मध्ये विशेष फायदा होऊ शकतो.

First published: October 28, 2019, 4:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading