भारताचा आयर्लंडवर दणदणीत विजय

भारताचा आयर्लंडवर दणदणीत विजय

  • Share this:

76b0935967a617e64114f2c03478bfba

10 मार्च :  वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडियानं आज आयर्लंडचा 8 विकेटने धुव्वा उडवत सलग पाचव्यांदा विजयाची नोंद केली आहे.

टॉस जिंकून आयर्लंडने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पोर्टरफिल्ड आणि स्टर्लिंगनं आयर्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. पोर्टरफिल्डने 67 रन्स करत शानदार हाफ सेंच्युरी ठोकली तर स्टर्लिंगनं 42 रन्स केले. त्यानंतर नील ओब्रायननं 75 रन्स करत फटकेबाजी केली आणि आयर्लंडला मोठ्या स्कोरजवळ नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मिडल ऑर्डरकडून हवी तशी मदत मिळाली नाही आणि आयर्लंडने टीम इंडियासमोर विजयासठी 260 रन्सचं टार्गेट ठेवलं. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने 3 तर, अश्विनने 2 विकेट्स मिळवल्या. तसेच रैना, यादव, जडेजा, मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एका बॅट्समनला माघारी धाडले. आणि सुरुवातीपासूनच आपले इरादे पक्के केले.

रोहित शर्मा आणि शिखर धवननं 174 रन्सची दणदणीत ओपनिंग पार्टनरशिप करून भारताला विजयाच्या जवळ नेलं. यावेळी शिखर धवनने स्पर्धेतील 2 शतक पूर्ण केलं. त्याने 84 बॉल्समध्ये 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने सेंच्यूरी ठोकली. पण सेंच्यूरी पूर्ण होताच तो बाद झाला. त्यानंतर कोहली आणि रहाणेनं फटकेबाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रोहितने 64 रन्स करत हाफ सेंच्युरी केली आहे.

या मॅचसाठी टीम इंडियाने फारसे काही बदल केलेला नाही. दरम्यान, आयर्लंडने भारताच्या विरोधात टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताने स्पर्धेतील यापूर्वी सर्व सामने जिंकत ग्रूपमध्ये अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा भारताच्या स्थानावर काहीही परिणाम होणार नाही. पण ही मॅच जर आयर्लंडने जिंकली असती तर त्यांनी थेट क्वार्टर फायनल्समध्ये प्रवेश केला असता.

Loading...

BATSMANRB4s6sSR
Rohit Sharmab Stuart Thompson64663396.97
Shikhar Dhawanc William Porterfield b Stuart Thompson10085115117.65
Virat Kohlinot out444241104.76
Ajinkya Rahanenot out332860117.86
Suresh Raina
MS Dhoni (C) (W)
Ravindra Jadeja
Ravichandran Ashwin
Mohammed Shami
Mohit Sharma
Umesh Yadav

Extras (b - 4, w - 13, no - 0, lb - 2, penalty - 0)19
Total260 (7.12 runs per over)
Fall of Wickets

1-174 (Rohit Sharma, 23.2 ov), 2-190 (Shikhar Dhawan, 27.4 ov)

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2015 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...