S M L

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपदाचं 'फुलराणी'चं स्वप्न भंगलं

Samruddha Bhambure | Updated On: Mar 9, 2015 01:16 PM IST

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपदाचं 'फुलराणी'चं स्वप्न भंगलं

09 मार्च :  भारताच्या सायना नेहवालचं ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न अखेर अधुरं राहिलं आहे. फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलीना मॅरीननं सायनाचा 21-16. 14-21, 7-21 असा पराभव केला.

इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. सायनानं कॅरोलिनाला हरवलं असतं, तर ऑल इंग्लंडचं विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असती. पण हा इतिहास रचण्याचं सायनाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.

दरम्यान, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत दडक मारणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलीये. याआधी 1980 साली पुरुष एकेरीत प्रकाश पडुकोण यांनी आणि 2001 साली पुलेला गोपीचंदनं ऑल इंग्लंड बॅडमिंटनचं विजेतेपद भारताला मिळवून देण्याचा पराक्रम गाजवला होता.

[wzslider autoplay="true"]

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2015 09:13 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close