S M L

विंडीजची धूळधाण, भारताची क्वार्टर फायनलमध्ये धडक

Sachin Salve | Updated On: Mar 6, 2015 07:56 PM IST

विंडीजची धूळधाण, भारताची क्वार्टर फायनलमध्ये धडक

06 मार्च : वेस्ट इंडीजची धूळधाण उडवत भारताने ऑस्ट्रेलियामध्ये विजयी धुळवड खेळलीये. भारताने विजयी चौकार लगावत दिमाखात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. विंडीजला 182 धावांत गुंडाळून विजयाचे माफक आव्हान भारताने 40 व्या ओव्हरमध्ये पूर्ण करत विजयीचे रंग उधळले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये भारताचा सामना आज झाला तो वेस्ट इंडीजसोबत.. विंडीजने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय बॉलर्सनं टिच्चून बॉलिंगपुढे विंडीजची टॉप ऑर्डर ढासळली. वर्ल्डकपमध्ये पहिले दुहेरी शतक झळकावणार्‍या ख्रिस गेलचीही आज काहीही जादू चालली नाही. गेल फक्त 21 रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. पण तळाला आलेल्या कॅप्टन जेसन होल्डरनं फटकेबाजी करत स्कोर वाढवला. होल्डरनं 57 रन्स ठोकले आणि विंडीजनं भारतापुढे विजयासाठी 183 रन्सचं टार्गेट ठेवलं. भारतातर्फे मोहम्मद शमीनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर उमेश यादव आणि जडेजानं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. इतर सर्व बॉलर्सनं प्रत्येकी 1 विकेट घेतली. विंडीजने दिलेलं माफक 183 रन्सचं आव्हान पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. शिखर धवन आणि रोहित शर्मा झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलींने टीम इंडियाची बाजू सांभाळली पण कोहलीही लवकर पव्हेलियनमध्ये परतला. कोहली 33, रहाणे 14 आणि रैना फक्त 10 रन्स करुन आऊट झाले. त्यानंतर कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने कॅप्टन इनिंग पेश करत संयमी फलंदाजी केली. धोणीने 45 रन्स करत भारताचा विजयी चौकार लगावला. भारताने विंडीजला लोळवत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीये. तसंच पाँईंट टेबलमध्येही अव्वल स्थान आणखी मजबूत केलंय.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2015 07:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close