नागालँडमध्ये जमावाच्या मारहाणीत बलात्कारातला आरोपी ठार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 6, 2015 12:30 PM IST

नागालँडमध्ये जमावाच्या मारहाणीत बलात्कारातला आरोपी ठार

 06 मार्च : नागालँडमध्ये तरुणीवर बलात्कार करणार्‍या नराधमाला संतप्त जमावाने तुरुंगातून बाहेर काढून भरचौकात त्याला बेदम मारहाण करून त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली.

दिमापूरमध्ये 23 फेब्रुवारी रोजी कॉलेमध्ये शिकणार्‍या तरुणीवर 35 वर्षी नराधमाने बलात्कार केला होता. पिडीत तरुणीने याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी बलात्कारी नराधमाला अटकही केली होती. सध्या तो आरोपी दिमापूरमधल्या सेंट्रल जेलमध्ये होता. या बलात्कार प्रकरणाविरोधात दिमापूरमध्ये संतापाचे वातावरण होते. गुरुवारी सकाळी संतप्त जमावाने आरोपीला फरफटत जेल बाहेर काढलं आणि यानंतर त्याला विवस्त्र करुन त्याला बेदम मारहाण केली. यानंतर दिमापूर शहरात सुमारे 7 किलोमीटरपर्यंत त्याची नग्नावस्थेतच धिंडही काढली. मारहाणी दरम्यान आरोपीचा मृत्यू झाला असला तरी जमावाचा राग शांत झाला नाही. जमावाने नराधमाच्या मृतदेहाला भर चौकात लटकवून दिले.

स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफही या सर्व प्रकाराला रोखू शकले नाही. जेलच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, 'स्थानिक पोलीस आणि जेलची सुरक्षा व्यवस्था होती. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जमाव चालून आल्याने आम्ही देखील हतबल झालो होतो' असं ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद आजूबाजूच्या परिसरात दिसून येण्याची शक्यता असल्याने गृह मंत्रालयाने आसाममध्येही अर्लट जारी केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2015 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close